Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
उमरगा: येळी, ता. उमरगा येथील राम कांबळे कुटूंबीय व सैफन मुल्ला कुटूंबीय यांच्यात दि. 03.10.2020 रोजी 11.00 वा. सु. गावातच नळाच्या सांडपाण्यावरुन वाद होउन दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी विरुध्द कुटूंबातील स्त्री- पुरुषांना अश्लिल शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खुनाची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी 23.00 वा. दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


वाशी: छबाबाई मछिंद्र पंडीत, रा. शेलु, ता. वाशी या दि. 01.10.2020 रोजी 06.00 वा. स्वत:च्या राहत्या घरासमोर होत्या. यावेळी भाउबंद- संजीवन पंडीत यांच्यासह कुटूंबातील संदीप, हिराबाई यांसह विकास नळे यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन छबाबाई यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. यात छबाबाई यांचा डावा हात मोडला. अशा मजकुराच्या छबाबाई पंडीत यांनी दि. 03.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 34, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments