Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात पाच जखमीतुळजापूर:   विठ्ठल निळकंट पुरी, रा. कवठा यांनी सुझूकी 800 कार क्र. एम.एच. 24 व्ही 6624 ही दि. 13.10.2020 रोजी 15.00 वा.सु. तुळजापूर- काक्रंबा पर्यायीमार्गावरील चौकात निष्काळजीपणे चालवून विजेंद्र विश्वनाथ घाडगे व सुरेखा रघुनाथ सावंत, रा. रुईभर, ता. उस्मानाबाद हे प्रवास करत असलेल्या स्कुटरवरला धडक दिली. या अपघातात सुरेखा सावंत व विजेंद्र घाडगे हे दोघे गंभीर जखमी झाले तर नमूद सुझूकी कार मधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले व स्कुटरचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या सुरेखा सावंत यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 16.10.2020 रोजी नोंदवला आहे.


 तामलवाडी: चालक- ओमप्रकाश शामलाल राजीर, रा. आत्मज, राज्य- उत्तरप्रदेश याने ट्रक क्र. जी.जे. 01 एफटी 8014 हा दि. 16.10.2020 रोजी 05.00 वा. सु. तामलवाडी शिवारातील शाकंभरी हॉटेलसमोरील रस्त्यावर निष्काळजीपणे चालवून रस्त्याच्या बाजूस असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 24 एबी 8358 ला धडक दिली. या अपघातात ट्रक क्र. एम.एच. 24 एबी 8358 चा सहायक- खंडू रघुनाथ सुरवसे हा जखमी झाला असुन ट्रकचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा मजकुराच्या ट्रक चालक- महेशराज कांबळे, रा. टाका, ता. औसा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: विक्रम उत्तम कटके, रा. गौतमनगर, उमरगा हे दि. 14.10.2020 रोजी 19.00 वा. सु. उमरगा येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी महादेव चव्हाण याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 9053 ही निष्काळजीपणे चालवून विक्रम कटके यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विक्रम कटके यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 16.10.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments