Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई शिराढोण: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन पो.ठा. शिराढोण च्या पथकाने दि. 17.10.2020 रोजी खामसवाडी येथे तीन ठिकाणी छापे मारेले. यात खामसवाडी येथील सोसायटी कार्यालयाजवळील परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी 1)अश्रुबा शहाजी शेळके 2)नितीन भागवत शेळके 3)उत्तम रंगनाथ शेळके, तीघे रा. खामसवाडी, ता. कळंब हे एकत्रीत 180 मि.ली. देशी- विदेशी दारुच्या 35 बाटल्या (किं.अं. 2,898/-रु.) विनापरवाना बाळगले असतांना पथकास आढळले.


तुळजापूर: तानाजी त्रिंबक भोसले, रा. गंधोरा, ता. तुळजापूर हा दि. 17.10.2020 रोजी मंगरुळ फाट्याजवळील ‘जानकी हॉटेल’ समारे 180 मि.ली. देशी- विदेशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 3,500/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर यांच्या पथकास आढळला.


 तुळजापूर: अभिजीत संभाजी मस्के, रा. देवसिंगा (तुळ), ता. तुळजापूर हा दि. 17.10.2020 रोजी नळदुर्ग- देवसिंगा रस्त्यावरील ‘आनंद हॉटेल’ येथे 180 मि.ली. देशी- विदेशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 2,320/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला.


 कळंब: सुरज विश्वनाथ खरडकर, रा. हासेगाव, ता. कळंब हा दि. 16.10.2020 रोजी कळंब येथील ‘निसर्गराजा हॉटेल’ च्या समोर 180 मि.ली. देशी दारुच्या 21 बाटल्या व 650 मि.ली. बियरच्या 5 बाटल्या (किं.अं. 1,942/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. कळंबच्या पथकास आढळला.


यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई


उस्मानाबाद (श.): जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेच्या आधारे पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकाने दि. 17.10.2020 रोजी उस्मानाबाद शहरात दोन ठिकाणी छापे मारेले. यात पहिल्या घटनेत शहरातील देशपांडे स्टॅड येथील अरजुमन पानटपरीसमोर राजु आमनाथ पारशी व दिगंबर अभिमन्यु शेरकर, दोघे रा. उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1,640/-रु. बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत शहरातील महावितरण कार्यालयाजवळील तांबोळी पानस्टॉलसमोर शकील कासीमसाब तांबोळी, रा. सांजावेस गल्ली, उस्मानाबाद हा कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,890/-रु. बाळगला असतांना आढळला. यावररुन पोलीसांनी जुगार साहित्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 


No comments