Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल


वाशी: भुम तालुक्यातील विजोरा येथे 1) दशरथ सौदागर मुळीक 2) बाळासाहेब मोटे 3)हनुमंत मोटे 4)दत्ता हावळे, सर्व रा. विजोरा यांच्या गटाचा गावकरी- 1) दिनकर श्रीधर खोसे 2)श्रीधर खोसे 3)सचिन खोसे 4)आप्पासाहेब सावंत यांच्या गटाशी दि. 16.10.2020 रोजी 19.00 वा. सु. शेतातील वृक्ष लागवडीच्या कारणावरुन वाद उफाळून आला. यात दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये 2 गुन्हे दि. 17.10.2020 रोजी नोंदवले आहेत.


 लोहारा: लक्ष्मी जाधव, रा. धानुरी, ता. लोहारा यांच्या घरातील सांडपाणी शेजारी- राम नाना पाटील, भरत मुसांडे यांच्या घरासमोर जात होते. या कारणावरुन दि. 17.10.2020 रोजी 15.00 वा. सु. राहत्या कॉलनीत राम पाटील, भरत मुसांडे, अविनाश मुसांडे, संकेत मुसांडे यांनी लक्ष्मी जाधव यांसह त्यांचे पती, मुलगा यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या लक्ष्मी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


                                                                                    

No comments