परंडा: महावितरण कार्यालयात गोंधळ- तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल परंडा: कंडारी शेतातील वीज चालु करण्याच्या कारणावरुन  .महावितरण कार्यालयात गोंधळ- तोडफोड करणाऱ्या चार जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महावितरण कनिष्ठ अभियंता- 1)सुरज नायर 2) शेखरसिंग राजपुत हे दोघे दि. 16.10.2020 रोजी 15.30 वा. परंडा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात कर्तव्यावर होते. यावेळी 1)राहुल चंद्रकांत डोके 2)राहुल गाढवे 3)मोतीराम वडार 4)तात्या पाटील, सर्व रा. कंडारी, ता. परंडा यांनी कार्यालयात येउन कंडारी शेतातील वीज चालु करण्याच्या कारणावरुन हुज्जत- गोंधळ घालून अपशब्द वापरून महावितरण कार्यालयातील कॅबीनच्या काचा फोडल्या. यात शेखरसिंग राजपुत यांना काच लागल्याने ते जखमी झाले. यावर सुरज नायर हे नमूद चौघांना समजावून सांगत असतांना त्यांनी सुरज नायर यांनाही धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. अशा प्रकारे त्या चौघांनी लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यावरुन सुरज नायर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments