Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

 


वाशी: 1) गोकुळ शिवाजी पारडे 2) संतोष पारडे 3)पद्मराज पारडे 4) हणुमंत पारडे, सर्व रा. इंदापुर, ता. वाशी यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 09.10.2020 रोजी 21.00 वा. सु. इंदापुर शिवारात गावकरी- जनक संदीपान कदम यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या जनक कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

लोहारा: 1) बाबु धर्मा सोनवणे 2) नवनाथ धर्मा सोनवणे 3) रविंद्र नवनाथ सोनवणे, तीघे रा. हराळी, ता. लोहारा यांनी शेतबांधावरुन रहदारीच्या व पुर्वीच्या भांडणावरुन दि. 08.10.2020 रोजी 19.00 वा. सु. हराळी शेतशिवारात भाऊबंद- नितीन धोंडीबा सोनवणे यांसह त्यांची पत्नीस शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन सोनवणे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 चोरी

 भुमि अभिलेख कार्यालय, तुळजापूर चे मुख्यालय सहायक उपअधिक्षक- संजय माने हे दि. 08.10.2020 रोजी 23.45 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानक येथे बसची वाट पाहत उषाखाली बॅग घेउन झोपले होते. यावेळी त्या बॅगमध्ये असलेले कार्यालयीन कागदपत्रे, शिक्के तसेच त्यांचे आधार कार्ड, पासबुक, आयकार्ड व रोख रक्कम 17,000/-रु. बॅगसह अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या संजय माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments