Header Ads

तुळजापूर : मराठा मोर्चातील गर्दीचा गैरफायदा घेउन चोरी करणारे पाच आरोपी अटकेत

 तुळजापूर: तुळजापूर शहरात दि. 09.10.2020 रोजी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील 65 ग्रॅम सोन्याचे दागिने व खिशातील रोख रक्कम असा माल चोरी केला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 340 / 2020 हा दाखल आहे.

या प्रकरणी पोलिसांनी  आरोपी- 1)आकाश भगवान काळे, वय 32 वर्षे 2)गजानन आकाश करंजकर, वय 28 वर्षे, दोघे रा. सुळ गल्ली, लातूर 3)दत्ता वसंत गिरी, रा. बाभळगाव, जि. लातुर 4)मयुर संजय मस्के, रा. लातुर 5)सिध्दार्थ संजय जाधव, रा. शिरापुर, ता. शिरुर यांना ताब्यात घेउन नमूद चोरीच्या मालापैकी 13,500/-रु. रोख रक्कम व चोरीच्या दोन मोबाईल फोनसह गुन्हा करण्यास वापरलेली हिरो एचएफ डीलक्स मो.सा. क्र. एम.एच. 24 बीएच 4307 ही जप्त केली आहे.

चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत

पो.ठा. ढोकी गु.र.क्र. 263 / 2020 भा.दं.सं. कलम- 379, 34 या चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- उध्दव अशोक काळे, वय 23 वर्षे, रा. बेंबळी कॉर्नर, उस्मानाबाद यास पोलिसांनी  उस्मानाबाद शहरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव पो.ठा. ढोकीच्या ताब्यात दिले आहे.


 

No comments