Header Ads

कोरोनाचा फटका : येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव यंदा भक्ताविना साजरा होणार

 कळंब  - तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीचा होऊ घातलेला  शारदीय नवराञ महोत्सव कोरोना  विषाणू संसर्ग महामारीमुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे.येडेश्वरी देवस्थान ट्रस्टने याबाबतचे प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध केले आहे. 


येरमाळाये थील प्रसिध्द येडेश्वरी  देवी श्री तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण  समजली जाते. तिच्या  दर्शनासाठी दररोज असंख्य भाविक येत असतात. दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. परंतु यंदा गेल्या सहा महिन्यापासून कोरोना महामारीमुळे मंदिर बंद असून, अद्यापही मंदिर खुले करण्याचा  आदेश न आल्याने  नवरात्र महोत्सव साध्या  पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. 


याबाबत देवस्थान ट्रस्टने तसे प्रसिध्दीपञक प्रकाशित केले आहे.या प्रसिध्दीपञकानुसार शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी  घटस्थापना कार्यक्रम मोजक्याच म्हणजे  पुजारी,मानकरी व पुरोहीत यांच्या उपस्थित साजरा केला जाणार आहे तसेच नवरात्रीतील नऊ दिवस केल्या जाणार्‍या देवीच्या महापुजा,होमहवन,विजयादशमी,कोजागीरी पौर्णीमेची विधीवत महापंचोपचार पुजाही मोजक्याच म्हणजे २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत केल्या जाणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.


याशिवाय घटस्थापनेदिवशी भवानी ज्योत घेऊन जाणार्‍या नवरात्र मंडळांना तसेच नवरात्र काळात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना (दि१२ ) सोमवार पासुनच मुख्यमंदीर तसेच परिसरामध्ये तीन किलोमिटर प्रवेशबंदी करण्यात आली असुन याकाळात भाविकांचे कोणतेही वाहन अढळुन आल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.शिवाय मंदिर भविकांच्या दर्शानासाठी पुर्ण नवराञ महोत्सव दरम्यान बंद राहणार असुन पायी येणार्‍या भाविकांना मंदीर परिसरामध्ये निर्बध घालण्यात आले आहे.नवरात्र काळात घटस्थापनेपासुन कोजागीरी पौर्णीमेपर्यत येडेश्वरी मंदीराकडे येणार्‍या सर्व मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन गावातील तसेच पचक्रोशितील भाविकांनी घरीच घटस्थापना करुन देविच्या प्रतीमेची प्रतीष्ठापना,पुजाआर्चा,नैवैध,घरीच दाखवुन साधारणपणे नवरात्र महोत्सव साजरा करावा असे अवाहन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.


श्री येडेश्वरी देविच्या वर्षामध्ये दोन याञा महोत्सव असतात . चैञ पौर्णिमेची याञा सर्वात मोठी असुन या याञेचा राज्यात दूसर्‍या क्रमांकावर मोठी भरणारी याञा असा लौकिक आहे,दुसरी यात्रा नारळी पौर्णीमेला असते तर दरवर्षी येणारा नवराञ महोत्सव म्हणजे पर्वनीच मानला जातो.नवराञ काळात रात्रंदिवस नऊ दिवस मंदिर भाविकांच्या गर्दिने गजबुजुन गेलेले असते या काळात महीला भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते.काही महीला भाविक शेकडो किलोमीटर दंडवत घालत,पायी चालत देविचा जयघोष करीत दर्शनासाठी येत असतात.नवराञ काळात पंचक्रोशीसह बाहेरुन येणारे भाविक येडेश्वरी देविचे मंदिर असलेल्या सुमारे दोन कि.मी. डोंगराला खेटा (प्रदक्षिणा ) घालण्याची ऐतिहासिक प्रथा आहे ती प्रथा कोरोना  विषाणू संसर्गामुळे यावर्षी प्रथमच बंद असणार आहे.

No comments