तुळजापूर : नवरात्र उत्सवातील पोलीसांना महिला मंडळांतर्फे मास्कचे वाटप

 
  तुळजापूर : नवरात्र उत्सवातील पोलीसांना महिला मंडळांतर्फे मास्कचे वाटप


तुळजापूर - येथे कोविड- 19 च्या अनुषंगाने नवरात्र उत्सवानिमीत्त भाविकांना तुळजापूर येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने तुळजापूर येथे ठिकठिकाणी जिल्ह्यातील पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दल यांसह गृहरक्षक दलाचे जवान तैनात आहेत. 


बंदोबस्तातील पोलीस अधिकारी- कर्मचारी यांना कोविड- 19 चा संसर्ग होउनये याची खबरदारी घेणे फार महत्त्वाचे आहे. ही बाब श्रीमती मनीषा शिवाजी पाटील व त्यांच्या सहकारी- श्रीमती संगीता क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या महिला मंडळाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी एक सामाजिक दायित्व म्हणून त्या बंदोबस्तावरील पोलीसांना मास्क वाटप करण्याचे ठरवून तुळजापूर येथील पोलीस संकुल या ठिकाणी  अपर पोलीस अधीक्षक . संदीप पालवे यांच्याकडे 300 मास्क सुपूर्द केले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर श्री. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद श्री. मोतीचंद राठोड उपस्थित होते. तसेच श्रीमती मनिषा पाटील यांच्या सहकारी या उपस्थित होत्या. श्रीमती पाटील यांनी बंदोबस्तावरील पोलीसांना मास्क वाटप केल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी श्रीमती पाटील यांच्या महिला मंडळाचे आभार मानले. 

  तुळजापूर : नवरात्र उत्सवातील पोलीसांना महिला मंडळांतर्फे मास्कचे वाटप


From around the web