उस्मानाबाद : १५ वर्षीय मुलीवर लैंगीक अत्याचार
उस्मानाबाद : उस्मानाबाद तालूक्यातील एका खेडेगातील एका 15 वर्षीय मुलीवर (नाव- गाव गोपनीय) गावातीलच एका पुरुषाने मागील 4 महिन्यांपासून वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. तसेच सदर प्रकार कोणास सांगीतल्यास तुला व तुझ्या आईस ठार करेल अशी धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत पुरुषाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376 (ज), 506 आणि पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


फसवणूक

पोलीस ठाणे, उमरगा: कलीम काझी, रा. उस्मानाबाद यांना व मिनीट्रक क्र. एम.एच. 13 आरबी 7997 च्या अज्ञात चालक यांना 22 मेट्रीक टन तांदुळ उमरगा येथून बाहेर नेण्यासाठी देण्यात आला होता. तो माल त्यांनी दि. 21.07.2020 रोजी दोन वाहनांत भरुन नेला परंतु ठरल्या ठिकाणी पोचवला नाही व परतही आणुन दिला नाही. अशा प्रकारे त्या दोघांनी फसवणूक करुन त्या तांदळाचा अपहार केला. अशा मजकुराच्या विजय शेषेराव पवार, रा. हनुमान नगर, उमरगा यांनी दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 407, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

No comments