Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई
 उमरगा: शिवकुमार विध्दीराअप्पा शहापुरे, रा. सोनार गल्ली, उमरगा हा दि. 07.10.2020 रोजी उमरगा येथील प्रभात हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,110/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 बेंबळी: परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक . ऋषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दि. 07.10.2020 रोजी 17.00 वा. सु. चिखली, ता. उस्मानाबाद येथील राजाभाऊ आवटे यांच्या खोलीवर छापा मारला. यावेळी 1)बाळासाहेब खोत 2)अजिंक्य थोरात 3)नागेश पवार 4)हनुमंत क्षिरसागर 5)जुबेर शेख 6)अमीर पठाण 7)लक्ष्मण घुले 8)मदार शेख 9)राम गडदे  10)अतिक वाघमारे 11)नवनाथ शेटे 12)बजरंग पवार असे सर्वजण तीरट हा जुगार खेळतांना आढळले. जुगारात आढळलेल्या एकुण 45,000/-रु. रोख रक्कमेसह जुगार साहित्य, 12 मोबाईल फोन, 5 मोटारसायकल, 1 सुझूकी स्वीफ्ट कार पोलीसांनी जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे


अवैध मद्य विरोधी कारवाई

 वाशी: गोरख बब्रुवान घोडके, रा. निपाणी, ता. भुम हा दि. 07.10.2020 रोजी गावातील यशराज हॉटेलसमोर देशी- विदेशी दारुच्या 55 बाटल्या (किं.अं. 3,430/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. वाशी च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments