Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात दोन ठार , दहा जखमीतुळजापूर: एका अज्ञात वाहनाने दि. 15.10.2020 रोजी 21.00 वा.सु. ज्योतीबा बागल यांचे शेताजवळ सांगवी मार्डी शिवार येथे अविनाश दिलीप मिसाळ, वय 25 वर्ष, रा.सिंदफळ ता. तुळजापूर हा त्याचे मोटार सायकल क्र.एम.एच.25 एए 7217 वर बसुन येत असताना  धडक दिली. या अपघातात तो जखमी होउन मयत झाला असुन संबंधीत अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरुन वाहनासह पळ काढला. अशा मजकुराच्या सचिन सुधाकर मिसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापूर: पिकप नंबर एम.एच.34बी.जे.6776 चा चालक साहील सलीम शेख यांने दि. 14.10.2020 रोजी 05.30 ते 06.00 वा.सु. खंडाळा गावचे पुढे एन एच 361 रोडवर आपल्या ताब्यातील पिकप अतिवेगाने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून रोडवर पावसाचे पाणी असल्याने रोडचे कडेला पिकप घेत असताना पिकपवरील नियंत्रण सुटून पिकप रोडच्या बाजुच्या कठडयावर जोरात आदळुन समोर बसलेला अमोल मनोहर बुरांडे हा या अपघातात गंभीर जखमी होउन मयत झाला आहे व इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या अजय लालु रविदास, वय 22 वर्ष रा.महाकाली कॉलनी कपिल चौक चंद्रपूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,337,304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापूर: इंडीगो कार नंबर एम.एच.02 सीएच 6688 चा चालक पदमाकर कुलकर्णी यांने दि. 09.10.2020 रोजी 15.00 वा.सु. तुळजापूर बायपास जवळ सिंदफळ शिवारात आपली कार हायगयीने व निष्काळजीपणे भरघाव वेगात रॉग साईडने रोड क्रॉस करत  असताना महींद्रा मरांझो कार क्र. एम.एच.26 टीसी 26 ला उजवीकडील बाजूस जोराची धडक देवून यातील 4 व्यक्तींना किरकोळ व गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या धोंडीराम बालासाहेब लोमटे, वय 22 वर्ष रा. इरळद ता. गंगाखेड जि.परभणी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,337,338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


भुम: पिकप नंबर एम.एच. 25 पी 4579 चे चालक यांने दि. 24.09.2020 रोजी 21.00 वा.सु. जयवंत नगर फाटयाजवळ पिकप हायगयीने व निष्काळजीपणे भरघाव वेगात रोडचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून ‍फिर्यादीचे मोटार सायकलला जोराची धडक दिली. यामध्ये फिर्यादीस किरकोळ व गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या एकनाथ नारायण नागरगोजे, वय 40 वर्ष रा. जयवंत नगर ता.भुम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279,337,338 आणि मो.वा.का. कलम- 184,134 (अ),(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments