Header Ads

नळदुर्ग : बंद पडलेल्या तुळजाभवानी कारखान्यातील साहित्याची चोरी नळदुर्ग: तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील प्लॅन्जड सीआय व एक कन्टीन्युअस सेपरेटर मशिनचे सुटे भाग एसएस एकुण किं.अं 42,500/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने दि. 08.10.2020 रोजी 13.00 वा. सु. चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या साखर कारखाना कर्मचारी- विकास बाबुराव भोसले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

तुळजापूर: चंद्रकांत महादेव खराडे, वय 42 वर्षे, रा. मसला (खुर्द), ता. तुळजापूर हे दि. 08.10.2020 रोजी 16.30 वा. सु. काक्रंबा शिवारातील घोगरे यांच्या विटभट्टीजवळ रस्त्याच्या कडेला मो.सा. क्र. एम.एच 13 सीव्ही 2734 वर थांबले होते. दरम्यान पिकअप क्र. एम.एच. 24 एबी 8792 च्या अज्ञात चालकाने पिकअप निष्काळजीपणे चालवून चंद्रकांत खराडे यांना समोरुन धडक दिली. या अपघातात चंद्रकांत खराडे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन पवार झाला. अशा मजकुराच्या सुग्रीव प्रभाकर जाधव, रा. मसला (खुर्द) यांनी दि. 09.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments