उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
परंडा: भाग्यश्री रामलिंग शिर्के, रा. वांगी (बु.), ता. भुम या आपला मुलगा- जयंत यासह दि. 06.10.2020 रोजी 14.00 वा. सु. दिर- अंकुश शिर्के यांच्या शेतात जेवन करत होते. यावेळी भाऊबंद- 1)गंगुबाई शिकें 2)रोहित शिर्के 3)ऋतुजा शिर्के 4)सिंधुबाई शिर्के 5)रुपाली शिर्के 6)महादेव शिर्के, सर्व रा. वांगी (बु.) 7)रामेश्वर वाघमारे 8)प्रियंका वाघमारे, दोघे रा. घारगांव, ता. परंडा यांनी बेकायदेशीर जमाव जमवून भाग्यश्री शिर्के यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भाग्यश्री शिर्के यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

तामलवाडी: विकास माळी, रा. सावरगांव, ता. तुळजापूर यांनी स्वत:ची शेतजमीन चुलते- महादेव माळी यांना बटईने दिली आहे. त्या शेतजमीनीत काम करण्यास नातेवाईक- गेनदेव माळी हे महादेव माळी यांना अडथळा करत होते. त्याचा जाब विकास माळी यांनी दि. 07.10.2020 रोजी 21.00 वा. सु. गेनदेव माळी यांच्या घरी जाउन विचारला असता गेनदेव माळी यांनी चिडून जाउन विकास यांना शिवीगाळ करुन कोयत्याने अंगावर वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विकास माळी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

नळदुर्ग: सराटी तांडा, ता. तुळजापूर येथील 1)तानाजी जंबल चव्हाण 2)जंबल चव्हाण 3)शारदाबाई चव्हाण यांच्या गटाचा गावातीलच नातेवाईक- 1)तानाजी दगडु चव्हाण 2)अनिता चव्हाण यांच्या गटाशी दि. 08.10.2020 रोजी 20.00 वा. सु. सराटी तांडा येथे पुर्वीच्या आर्थिक व्यवहारावरुन वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये 2 गुन्हे दि. 09.10.2020 रोजी नोंदवले आहेत.


                                                                             

No comments