Header Ads

उस्मानाबाद : चोरीच्या गुन्ह्यातील पहिजे आरोपी अटकेत


उस्मानाबाद -  किरण पंडित शिंदे, वय 32 वर्षे, रा. अनाळा, ता. भुम हा पो.ठा. आंबी गु.र.क्र. 76 / 2018 भा.दं.सं. कलम- 379, 34 या चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांना मागील 2 वर्षापासून हवा होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, पोकॉ- पांडुरंग सावंत, सर्जे यांच्या पथकाने नमूद आरोपीस दि. 05.10.2020 रोजी भुम शहर परिसरातून ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव पो.ठा. आंबीच्या ताब्यात दिले आहे.


चोरी


 वाशी: बाबासाहेब सुर्यभान मोटे, रा. गिरवली, ता. भुम यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 0753 ही सान्नेवाडी शिवारातील शेतात एका पत्रा शेडच्या बाजूस लावली होती ती दि. 06.10.2020 रोजी 07.30 वा. सु. लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या बाबासाहेब मोटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

No comments