तामलवाडी : अवैध मद्य विरोधी कारवाई
 तामलवाडी: रोहित बाबु वडजे, रा. सेवालालनगर तांडा, मार्डी, ता. सोलापूर (उ.) हा दि. 06.10.2020 रोजी मो.सा. क्र. एम.एच. 13 डीबी 3290 वरुन दोन रबरी ट्युबमध्ये 50 लि. गावठी दारु  (किं.अं. 2,500/-रु.) अवैधरित्या वाहुन नेत असतांना पो.ठा. तामलवाडी च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्यासह वाहतूकीस वापरलेली मो.सा. जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मोटार वाहन कायदा अंतर्गत 209 कारवाया- 45,200 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 05.10.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 209 कारवाया करुन 45,200 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

 

मनाई आदेशांचे उल्लंघन: 14 व्यक्तींना प्रत्येकी 500/-रु. दंड


उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पो.ठा. उमरगा यांनी दि. 05.10.2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 14 व्यक्तींकडुन प्रत्येकी 500/-रु. दंड वसुल केला आहे.

No comments