Header Ads

उमरगा : विटभट्टीवरील मजुर महिलेवर लैंगीक अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


 उमरगा: उस्मानाबाद जिल्ह्यातील एका विटभट्टी चालकाने त्याच्या भट्टीवरील मजुर महिलेचे  (नाव- गाव गोपनीय) दि. 19.09.2020 रोजी अपहरण करुन तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेउन दि. 26.09.2020 पर्यंतच्या कालावधीत तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. तसेच याची वाच्यता केल्यास तुला ठार मारु अशी धमकी संबंधीत विटभट्टी मालकाच्या 2 सहकाऱ्यांनी पिडीत महिलेस दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 05.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तीन्ही पुरुषांविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 363, 323, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण


 ढोकी: प्रणव भागवत दांगट, रा. खेड, ता. उस्मानाबाद हा दि. 05.10.2020 रोजी 17.00 वा. सु. आपल्या शेतात काम करत होते. यावेळी भाऊबंद- दत्तात्रय जनार्धन दांगट यांनी शेतातील बांधावरुन रहदारीच्या कारणावरुन प्रणव दांगड यास शिवीगाळ करुन दगडाने कारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रणव दांगट याने वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 शिराढोण: संपत डिगंबर पवार, रा. करंजकल्ला, ता. कळंब हे दि. 30.09.2020 रोजी 15.00 वा. सु. शेतातील सामाईक बांधावरुन चालत जात होते. यावेळी भाऊ- श्रीधर दिगंब पवार व पुतण्या- दिपक श्रीधर पवार या दोघा पिता- पुत्रांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन संपत पवार यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संपत पवार यांनी दि. 05.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments