उस्मानाबाद : पोलीस असल्याची बतावणी करुन एकाची फसवणूक

 


उस्मानाबाद - मोतीचंद हिराचंद चव्हाण, वय 71 वर्षे, रा. संतकृपा नगर, उस्मानाबाद हे दि. 05.10.2020 रोजी 12.15 वा. सु. उस्मानाबाद शहरातील शुभमंगल कार्यालयाच्या पाठीमागील रस्त्याने मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या 2 अनोळखी पुरुषांनी मोतीचंद चव्हाण यांना थांबवले. 


त्यातील एका पुरुषाने आपण पोलीस असल्याची बतावणी करुन मोतीचंद चव्हाण यांना अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगीतले. यावर चव्हाण यांनी हातातील 25 ग्रॅम सोन्याचे ब्रासलेट व गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याचे लॉकेट काढून रुमालात बांधत असतांना त्या दोघा पुरुषांनी हातचलाखीने ते रुमालात बांधलेले दागिने काढून घेतले. थोडया अंतरावर गेल्यानंतर मोतीचंद चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता रुमालात दागिने आढळले नाही. अशा मजकुराच्या मोतीचंद चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


शेतकरी महिलेची फसवणूक 

तुळजापूर: कलावती शिवराम निर्मळे, रा. किलज, ता. तुळजापूर यांच्यासह त्यांच्या मुलाच्या नावे किलज शिवारात गट क्र. 305 व 307 मध्ये 5.12 हेक्टर शेतजमीन आहे. ही शेतजमीन 1)सुर्यकांत देशमाने 2)अजित भागवत 3)कालिदास झोंबाडे 4)शंकर घुगरे 5) पी.एस. कोकाटे 6)किलज सज्जा चे तत्कालीन तलाठी 7) तत्कालीन मंडळ अधिकारी 8) तत्कालीन दुय्यम निबंधक या सर्वांनी संगणमत करुन नकली दस्तऐवज तयार केले. या दस्तऐवजांच्या सहायाने त्या शेतजमीनीतील 3.12 हेक्टर क्षेत्र सुर्यकांत देशमाने यांना तर 2 हेक्टर क्षेत्र अजित भागवत यांना दि. 29.01.2020 रोजी विक्री केले. अशा मजकुराच्या कलावती निर्मळे यांनी दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 471, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments