भूम : बँकेतील फिक्स डिपॉजिटची रक्कम परस्पर उचलली


 भुम: 1) भागवत वासुदेव गावडे, रा. पाथ्रुड, ता. भुम 2) मराठवाडा ग्रामीण बँक शाखा पथ्रुडचे तत्कालीन व्यवस्थापक या दोघांनी संगनमताने दि. जुलै- 2002 ते ऑगस्ट- 2020 या कालावधीत ब्रम्हदेव वासुदेव गावडे, रा. सिडको, औरंगाबाद यांच्या नावे बनावट सह्या व कागदपत्राच्या सहाय्याने पाथ्रुड येथील ग्रामीण बँकेत बचत खाते उघडले. 


ब्रम्हदेव गावडे यांनी पाथ्रुड ग्रामीण बँकेत फिक्स डिपॉजिट केलेली 1,05,733 ₹ रक्कम त्या बनावट खात्यावर वळती करुन ती रक्कम काढून घेतली. अशा प्रकारे नमूद दोघांनी ब्रम्हदेव गावडे यांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशा मजकुराच्या ब्रम्हदेव गावडे यांनी दि. 05.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420, 464, 465, 467, 468, 471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments