Header Ads

कळंब : मोटारसायकलने धडक दिल्याने एक जखमी

 कळंब: शंकर सुरेश चोंदे, वय 40 वर्षे, रा. चोंदे गल्ली, कळंब हे दि. 30.09.2020 रोजी 14.00 वा. सु. डिकसळ येथील बर्फाच्या कारखान्यासमारील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी हिरो होंडा शाईन मोटारसायकल च्या अज्ञात चालकाने मो.सा. निष्काळजीपणे चालवून शंकर चोंदे यांना जोराची धडक दिली. या अपघातात शंकर यांच्या पायास, डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संबंधीत मोटारसायकलस्वार मो.सा. सह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या पोपट सुरेश चोंदे यांनी दि. 05.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments