वाशी : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने सराफास लुटणारा आरोपी 4 वर्षानंतर अटकेत


 वाशी: कळंब येथील सुवर्णकार- बळराम लक्ष्मीकांत सोनी यांना 25 ग्रॅम सोन्याचे खरे दागिने फक्त 4,000/-रु. किंमतीत देण्यात आले होते. अजून जास्त सोने अगदी स्वस्तात पाहिजे असेल तर ठरवलेल्या जागी सरमकुंडी फाट्या पलीकडे आडबाजूला झूडपांत या असे सांगन्यात आले होते. यावर सोनी हे दि. 29.02.2016 रोजी आडबाजूला असलेल्या त्या ठरलेल्या ठिकाणी गेले. यावेळी चेहरा झाकलेल्या व्यक्तींनी तसे स्वस्‍त सोने न देता  सोनी यांना धक्काबुक्की करुन त्‍यांच्या जवळील 8,00,000/-रु. व आयफोन घेउन पोबारा केला होता. 


सोनी यांनी त्याची तक्रार वाशी पो.ठा. येथे गु.र.क्र. 30 / 2016 भा.दं.सं. कलम- 395 नुसार 01.03.2016 रोजी नोंदवली होती. या प्रकरणी 7 आरोपींविरुध्द मा. न्यायालयात RCC No. 4 /2017 हा खटला न्यायप्रविष्ट आहे. यातील पाहिजे आरोपी- धर्मेंद्र बाबुशा भोसले, वय 40 वर्षे, रा. घाटपिंप्री, ता. वाशी हा अद्याप मिळुन आला नव्हता. पोलीसांनी वेळोवळी छापा टाकून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्यात यशस्वी होत असे. वाशी पो.ठा. च्या पथकाने दि. 04.10.2020 रोजी गोपनीय खबरेच्या आधारे अचानकपणे घाटपिंप्री येथे छापा टाकून त्यास अटक केले आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने त्यास उस्मानाबाद जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

No comments