Header Ads

कळंब : शेतमालकीच्या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण
 कळंब: दत्तात्रय भिमराव मडके, रा. मोहा, ता. कळंब हे दि. 04.10.2020 रोजी 16.00 वा. सु. बाभळगाव शिवारातील शेतात होते. यावेळी भाऊबंद- प्रमोद कल्याण मडके, ज्ञानेश्वर मडके, मंगल मडके, शामलबाई मडके यांनी शेतमालकीच्या व सोयाबीन पिकाच्या कारणावरुन दत्तात्रय मडके यांसह त्यांची पत्नी- मंदाकीनी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्तात्रय मडके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments