Header Ads

परंडा : सुनेचा छळ, गुन्हा दाखल


 परंडा: रेखा धनाजी बुरगुटे, रा. उपळे (दु.), ता. बार्शी यांनी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)धनाजी अशोक बुरगुटे (पती) 2) अशोक (सासरे) 3) सुनंदा (सासु) 4) प्रताप (दिर) 5) प्रियंका सर्व रा. उपळे (दु.), ता. बार्शी 6) राजकन्या शिंदे 7) कुबेर शिंदे, दोघे रा. लोणी, ता. परंडा यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने रेखा यांचा सासरी उपळे (दु.) येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या रेखा यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 03.10.2020 रोजी नोंदवला आहे.

अपहरण

 परंडा: कोंडीबा मारुती तांबे, रा. कौडगांव, ता. परंडा याचे नवनाथ बाबा खाडे, रा. सोनारी, ता. परंडा याने दि. 07. 02.2020 रोजी परंडा शहरातून फुस लावून अपहरण करुन तेव्हा पासून आजतागायत अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले आहे. या प्रकरणी न्यायालयात मारुती तांबे (पिता) यांनी  दिलेल्या अर्जावर मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरुन दि. 03.10.2020 रोजी भा.दं.सं. कलम- 365 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments