तुळजापूर : लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखल


 तुळजापूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अंकुश रामचंद्र औताडे, हे दि. 03.10.2020 रोजी नळदुर्ग रस्ता, तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर पथकासह कर्तव्य बजावत उभे होते. यावेळी रोहित व रोहन रमेश खुणे, रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद या दोघा भावांनी नोंदणी क्रमांक पट्टी नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड एन्डेव्हर कारने तेथे येउन पथकासोबत हुज्जत घालून शिवीगाळ सुरु केली.


 “तुम्ही माझ्या भावाला का ताब्यात घेतले. त्याला येथे आणन्याचा अधिकार कोणी दिला. मी कोण आहे, माझे वडील कोण आहेत हे तुम्हाला माहित नाही. मी खुणे साहेबांचा मुलगा आहे. माझ्याकडे पिस्टल आहे त्याने तुम्हा सर्वांना खल्लास करेण.” अशा धमक्या पथकास देउन रस्त्याबाजूचा दगड पथकास फेकून मारला. तसेच त्यांनी आनलेली नमूद कार पथकातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालन्याचा प्रयत्न केला. यात पथकातील कॉन्स्टेबल- प्रकाश सावंत व आण्णा कचरे हे दोघे जखमी झाले. यावेळी दोघा खुणे बंधुंनी पथकाने पकडलेल्या दिनानाथ तिवारी यास वाहनासह पळवून लावले.यावरुन अंकुश औताडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोघा खुणे बंधुंविरुध्द भा.दं.सं. कलम- 307, 353, 332, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई


शिराढोण: सुरज महादेव भोगले, रा. लोहटा (पुर्व), ता. कळंब हा दि. 03.10.2020 रोजी स्वत:च्या राहत्या घरी 180 मि.ली. देशी दारुच्या 45 बाटल्या (किं.अं. 5,460/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी देशी दारुच्या बाटल्या जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments