तुळजापूर : चोरीच्या मोबाईल फोन- रोख रकमेसह आरोपी अटकेत
उस्मानाबाद -  आरळी (खु.), ता. तुळजापूर येथे एका घरातील मोबाइल आणि रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. 


वैजीनाथ नागनाथ कांबळे, रा. आरळी (खु.), ता. तुळजापूर हे दि. 16.09.2020 रोजी रात्री आपल्या राहत्या पत्रा शेडमध्ये दरवाजा उघडा ठेउन झोपले असतांना विवो एस-1 प्रो मोबाईल फोन व रोख रक्कम 4,500/-रु. असा माल चोरीस गेला होता. यावरुन नळदुर्ग पो.ठा. 286 / 2020 भा.दं.सं. कलम- 379 अन्वये दाखल आहे.


            सदर गुन्हा तपासात स्था.गु.शा. च्या पोनि- दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, पोकॉ- पांडुरंग सावंत, सर्जे यांच्या पथकाने कुंभारी, ता. तुळजापूर येथील सुरज समाधान काळे, वय 19 वर्षे यास दि. 03.10.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद चोरीचा माल जप्त करुन उर्वरीत कार्यवाहिस्तव पो.ठा. नळदुर्ग च्या ताब्यात दिले आहे. 


चोरी

पोलीस ठाणे, आनंदनगर: सतिश किसनराव तांबारे, रा. म्हाडा कॉलणी, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 03.10.2020 रोजी 13.00 वा. सु. तोडून आतील सोने- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकत्रीत 36,500/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या सतिश तांबारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments