Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना


 ढोकी: बिलाल हारुन शेख, रा. कसबा पेठ, ता. हवेली. जि. पुणे यांच्या तडवळा (क.) सर्वे क्र. 329 मधील शेतातील सोयाबीन पिकाच्या ढिगारा  झाकुन ठेवलेले टारपोलीन अज्ञात चोरट्याने दि. 30.09.2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या बिलाल शेख यांनी दि 02.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मुरुम: उमरगा तालुक्यात येणेगूर शिवारातील महावितरणच्या विद्युत रोहित्रास अज्ञात चोरट्याने दि. 02.10.2020 रोजी मध्यरात्री छिद्र पाडून रोहित्रातील 180 लि. तेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या महावितरण तंत्रज्ञ- पवन पंडीत गुरव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


शिराढोण: विक्रम सुर्यभान शिंदे, रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी बजाज डिस्कव्हर मो.सा. क्र. एम.एच. 12 जेवाय 2509 ही दि. 14.09.2020 रोजी 01.30 वा. सु. मंगरुळ सर्वे क्र. 653 मधील शेतात लावली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या विक्रम शिंदे यांनी दि. 03.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive

No comments