Header Ads

उमरगा: सुनेचा छळ, गुन्हा दाखल
 उमरगा: माया लखन रुपनर, रा. भगतवाडी, ता. उमरगा यांनी माहेरहुन पैसे व दागिने आणावेत असा तगादा सासरकडील 1)लखन किसन रुपनर (पती) 2) मंगलबाई (सासु) 3) किसन रुपनर (सासरा) 4) अर्चना काळे (नणंद) 5) कांचन मुकनर (नणंद) 6) सोनाली (जाऊ) 7) रघुनाथ (दिर), सर्व रा. सरस्वती कॉलनी, निलंगा यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने माया यांचा सन- 2019 पासुन सासरी निलंगा येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या माया यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 02.10.2020 रोजी नोंदवला आहे.


अपहरणाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अटकेत


उस्मानाबाद -  आनंदनगर गु.र.क्र. 331 / 2019 भा.दं.सं. कलम- 363, 354, 34 आणि पोक्सो कायदा कलम- 11 (4), 12 या गुन्ह्यातील आरोपी- विजय बाळु हारण, वय 20 वर्षे, रा. उस्मानाबाद याचा वर्षभरापासून पोलीस शोध घेत होते. स्था.गु.शा. चे पोनि- श्री दगुभाई शेख यांच्या नेतृत्वाखालील पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, बलदेव ठाकुर यांच्या पथकाने त्यास दि. 03.10.2020 रोजी उस्मानाबाद शहर परिसरातून ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

No comments