Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल
 ढोकी: शेतजमीन वाटणी, कुपनलीकेचे पाणी वापरण्याच्या कारणावरुन मच्छिंद्र गुंडीबा कुचेकर, रा. टाकळी (ढोकी), ता. उस्मानाबाद यांना दि. 01.10.2020 रोजी 08.00 वा. सु. टाकळी येथील आंबाबाई मंदराजवळ भाऊ- रावसाहेब गुंडीबा कुचेकर, फुलचंद कुचेकर, सुरेश कुचेकर व पुतण्या- ऋषी फुलचंद कुचेकर व सुनिल रावसाहेब कुचेकर या पाचजणांनी शिवीगाळ करुन चटणी डोळ्यात टाकून दगड व काठीने मारहाण केली. तसेच मच्छिंद्र कुचेकर यांचा मुलगा- अनिल यासही मारहाण केली. अशा मजकुराच्या मच्छिंद्र कुचेकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 143, 147, 148, 149 आणि म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग: राम मनोहर सलगरे, रा. लोहगाव, ता. तुळजापूर हे त्यांच्या आईसह दि. 29.09.2020 रोजी 19.00 वा. सु. घरासमोर थांबले होते. यावेळी गावातील- मारुती फडतरे याच्यासह नळदुर्ग येथील आकाश घोडके, गजानन घोडके व अन्य एच व्यक्ती अशा चौघांनी राम सलगरे यांना, “तुझा भाऊ कुठे गेला. त्याला बघायचे का.” असे म्हणुन राम व त्यांच्या आईसोबत वाद घालून शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी, लाकडी स्टम्पने मारहाण केली. या मारहाणीत राम यांच्या डोक्याची कवठी फॅक्चर झाली तर त्यांची आई किरकोळ जखमी झाली. अशा मजकुराच्या राम सलगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 01.10.2020 रोजी नोंदवला आहे.


 बेंबळी: ज्ञानेश्वर मसे, रा. सोरोळा, ता. उस्मानाबाद व त्यांचा सालगडी- विठ्ठल चांदणे हे दोघे दि. 29.09.2020 रोजी 22.00 वा. सु. शेताकडे जात होते. यावेळी चिखली येथील आर्यन पेट्रोल पंपाजवळ गावातीलच- सुशेन बोंदर, शिवाजी बोंदर, माने, मुन्ना यांसह अन्य 5 व्यक्ती यांनी बेकायदेशीर जमाव जमवून भांडणाची कुरापत काढून ज्ञानेश्वर मसे व विठ्ठल चांदणे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज, काठी, वायरने मारहाण केली. यात ज्ञानेश्वर मसे यांचा डावा हात मोडला तर विठ्ठल हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर मसे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 325, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दि. 01.10.2020 रोजी नोंदवला आहे.


 लोहारा: राहुल यमजी राठोड, रा. खेड, ता. लोहारा यांच्या म्हशीने दि. 01.10.2020 रोजी 17.00 वा. सु. शेजारील- अमोल खेमा राठोड यांच्या घरासमोरील गवत खाल्ले. त्यावर चिडून जाउन अमोल राठोड, अनिल राठोड, सुनिल राठोड, राजेंद्र राठोड अशा चौघांनी राहुल राठोड यांसह त्यांची आई व भाऊ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राहुल राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments