Header Ads

उस्मानाबाद : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगीक अत्याचारउस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महिला आणि तरुणीवर  लैंगीक अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका विवाहित तरुणाने एका तरुणीला फसवून  लैंगीक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. 


 उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तरुण गावातीलच तरुणीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी- 2020 ते दि. 08.10.2020 या काळात निरनिराळ्या ठिकाणी शारिरीक संबंध बनवत राहिला. दि. 02.10.2020 रोजी तो तरुण न्यायालयात विवाहासाठी आवश्यक कागदपत्र आणन्याच्या बहान्याने गावाकडे निघून गेला. तो न परतल्याने त्या तरुणीने त्याच्या घरी जाउन चौकशी केली असता तो विवाहीत असल्याचे तीला समजले.


 यावेळी त्या तरुणाच्या कुटूंबीयांनी त्या तरुणीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन आमच्या घराकडे फिरकल्यास तुला ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (2)(एन), 323, 504, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दि. 09.10.2020 रोजी नोंदवला आहे.


 

No comments