उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटनाउस्मानाबाद - अंबादास महादेव खिचडे, रा. उपळा (मा.), ता. उस्मानाबाद यांनी दि. 29.09.2020 रोजी 20.30 वा. सु. शिंगोली शिवारात हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 25 ए 7188 ही लावली होती. त्यांना ती मो.सा. 21.00 वा. सु. लावल्या जागी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अंबादास खिचडे यांनी दि. 30.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


, कळंब: ज्ञानेश्वर कल्ण्याण मडके, रा. मोहा, ता. कळंब यांच्या मोहा सर्वे गट क्र. 990 मधील शेतातील सोयाबीनचे उभे पिक दि. 30.09.2020 रोजी 12.30 वा. सु. गावातील भाऊबंद- 1) विलास शामराव मडके 2) आशा मडके 3) नवनाथ मडके या तीघांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने कापून चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर मडके यांनी दि. 01.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments