उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलउस्मानाबाद -  अस्मिता पारवे, रा. आनंदनगर, उस्मानाबाद या दि. 30.09.2020 रोजी 18.00 वा. सु. राहत्या घरी होत्या. यावेळी गल्लीतीलच तेजस मस्के याने पुर्वीच्या भांडणांच्या कारणावरुन अस्मिता पारवे यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उस्मिता पारवे यांच्या घराच्या खिडकीवर, स्कुटरवर दगडफेक करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अस्मिता पारवे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

 शिराढोन:  शेताचा बांध नांगरल्याच्या कारणावरुन श्रीधर दिगंबर पवार, रा. करंजकल्ला, ता. कळंब यांना दि. 30.09.2020 रोजी शेतात भाऊ- संपत दिगंबर पवार व पुतण्या- पंकज संपत पवार या दोघा पिता- पुत्रांनी दगडाने तसेच चावा घेउन मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीधर पवार यांनी दि. 01.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments