उस्मानाबाद : मोटारसायकलची धडक, दोन जखमी

 


उस्मानाबाद -  मिलींद अशोक मस्के, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद हे त्यांच्या पत्नीस मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 9932 वरुन दि. 22.09.2020 रोजी रात्री 10.45 वा. उस्मानाबाद- गावसुद असे घेउन जात होते. दरम्यान अभिजीत अनिल चव्हाण, रा. उस्मानाबाद याने नोंदणी क्रमांक नसलेली मोटारसायकल निष्काळजीपणे चालवून मस्के यांच्या मो.सा. ला धडक दिली. या अपधातात मस्के पती- पत्नी गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मिलींद मस्के यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 01.10.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments