उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना


 तुळजापूर: सौदागर सदाशिव घोगरे, रा. काक्रंबा, तुळजापूर हे दि. 06.10.2020 रोजी 19.30 वा. सु. गावातून काक्रंबा येथील स्वत:च्या शेत गट क्र. 376 मध्ये आले असता गावकरी- 1)शंकर दाजी गायकवाड 2) प्रविण गौतम मस्के 3) अमोल कोंडीबा मस्के हे तीघे त्यांच्या शेतातील दोन पोती सोयाबीन चोरुन नेत होते. सौदागर घोगरे यांनी त्यांस हटकले असता अमोल मस्के हा अंधाराचा फायदा घेउन पळून गेला तर प्रविण मस्के व शंकर गायकवाड या दोघांना सौदागर घोगरे यांनी पकडून मुद्देमालासह तुळजापूर पो.ठा. च्या ताब्यात दिले. अशा मजकुराच्या सौदागर घोगरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तामलवाडी: उमेश गणपती गाटे, रा. दहिवडी, ता. तुळजापूर यांच्या दहिवडी शेत गट क्र. 106 मधील गोठ्यासमोर बांधलेल्या 2 म्हशी व 1 रेडकू दि. 05 व 06.10.2020 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या उमेश गाटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


परंडा: कांतीलाल नाना घळके, रा. बावची रोड, परंडा यांनी आपली हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 6478 ही दि. 22.09.2020 रोजी 21.30 वा. सु. राहत्या घरासमोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या कांतीलाल घळके यांनी दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments