Header Ads

येरमाळा पोलीसांच्या कौशल्याने बुरखाधारी चोर मुद्देमालासह अटकेत


 येरमाळा: धनंजय पांडुरंग घोळवे, रा. तेरखेडा, ता. वाशी यांच्या मौजे रत्नापूर फाटा जवळील ‘पांडुरंग हॉटेल’ च्या खिडकीचा काच अज्ञात चोरट्याने दि. 07.08.2020 रोजी मध्यरात्री फोडून आतील सीसीटीव्ही- संगणकाचा डेल कंपनीचा 19 इंची एल.सी.डी. स्क्रीन चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. येरमाळा येथे गु.र.क्र. 106 / 2020 भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये दाखल आहे.


            या गुन्ह्याच्या तपासात पोलीसांना परिसरातील एका सीसीटीव्हीचे छायाचित्रण मिळाले. यात एक चेहरा झाकलेला तरुण चोरी करुन जात असल्याचे आढळले. चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटत नसल्याने सपोनि- श्री पंडीत सोनवणे यांनी ते छायाचित्रण अनेकदा बघीतले. छायाचित्रणातील तरुणाचा बांधा व चालन्याची लकब पाहता तो तरुण ओळखीचा वाटत होता. तो तरुण येरमाळा येथील एका व्यायामशाळेजवळून अनेकदा जात असतांना पाहिला असल्याचे त्यांना अचानक आठवले.  यावर त्यांनी व्यायामशाळा परिसरातील लोकांना ते सीसीटीव्ही छायाचित्रण दाखवून माहिती घेतली. 


यावर लोकांनी सीसीटीव्हीतील बुरखेधारी आरोपीचा बांधा व चालन्याची लकब पाहून तो तरुण आनंद लक्षमण वाघमारे, रा. रत्नापूर, ता. कळंब येथील असल्याचे व सध्या तो पुण्यास नोकरीस गेला असल्याचे समजले. पोलीसांनी त्याचा ठावठीकाणा शोधून चोरी केलेल्या नमूद एल.सी.डी. सह त्यास काल दि. 06.10.2020 रोजी अटक केली. अशा प्रकारे चेहरा झाकुन चोरी करणारा येरमाळा पोलीसांच्या कौशल्याने हाती आला.

No comments