Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखललोहारा: महेश हरिदास डोंगरे, रा. बिटरगाव (वांगी), ता. करमाळा यांच्या वाहनात असलेले रोख 1,00,000/-रु. व एचपी कंपनीचा लॅपटॉप हा दि. 05.10.2020 रोजी 14.00 वा. सु. शिवनगर बिराजदार हॉल येथील वाहन स्थळावरील वाहनातून त्यांचा चालक- कैलास मोहचकर, रा. मुखेड, जि. नांदेड याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या महेश डोंगरे यांनी दि. 07.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 भुम: दिपक नाईकनवरे, रा. पाटसांगवी, ता. भुम यांनी आपल्या राहत्या घरासमोर ठेवलेली हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एई 5996 हीच्यासह बाजूच्या पत्रा शेडमधील 3 शेळ्या, 2 बोकड, 1 करडू असा माल अज्ञात चोरट्याने दि. 05.10.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या दिपक नाईकनवरे यांनी दि. 08.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments