Header Ads

उस्मानाबाद : अपघात, फसवणूक, मारहाण गुन्हे दाखल

                                                         


                  फसवणूक


पोलीस ठाणे, उमरगा: कलीम काझी, रा. उस्मानाबाद यांना व मिनीट्रक क्र. एम.एच. 13 आरबी 7997 च्या अज्ञात चालक यांना 22 मेट्रीक टन तांदुळ उमरगा येथून बाहेर नेण्यासाठी देण्यात आला होता. तो माल त्यांनी दि. 21.07.2020 रोजी दोन वाहनांत भरुन नेला परंतु ठरल्या ठिकाणी पोचवला नाही व परतही आणुन दिला नाही. अशा प्रकारे त्या दोघांनी फसवणूक करुन त्या तांदळाचा अपहार केला. अशा मजकुराच्या विजय शेषेराव पवार, रा. हनुमान नगर, उमरगा यांनी दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 407, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात


पोलीस ठाणे, तुळजापूर: एसटी बस क्र. एम.एच. 20 बीएल 3868 च्या चालकाने दि. 02.10.2020 रोजी 11.30 वा. सु. वडगाव (लाख) शिवारातील रस्त्यावर बस निष्काळजीपणे, हयगईने चालवून समोरुन चालत येत असलेले कपील देवीदास सोनवणे, वय 26 वर्षे, रा. वडगाव (लाख), ता. तुळजापूर यांना धडक दिली. या अपघातात कपील सोनवणे हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमूद एसटी बसचा अज्ञात चालक बससह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या देविदास आंबादास सोनवणे (मयताचे पिता) यांनी दि. 06.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहाण 

पोलीस ठाणे, नळदुर्ग: संभाजी बाबुराव जाधव, रा. येडोळा, ता. तुळजापूर हे दि. 06.10.2020 रोजी 08.00 वा. सु. स्वत:च्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- कालीदास दगडू जाधव हे आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करत असतांना संभाजी जाधव यांच्या शेतात  येत होता. ट्रॅक्टरच्या चालन्याने शेतजमीन टनक होत असल्याने संभाजी जाधव यांनी कालीदास जाधव यांना ट्रॅक्टर न आणन्यास सांगीतले. याचे पर्यावसान वादात होउन कालीदास जाधव यांनी संभाजी जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विळ्याने पायावर वार करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संभाजी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, भुम: वाकवड, ता. भुम येथील शेळके भाऊबंदातील रमेश शेळके, महादेव शेळके यांच्या 8 सदस्यीय गटाचा राजेंद्र शेळके, बिरमल शेळके यांच्यासह 5 सदस्यीय गटाशी दि. 04.10.2020 रोजी 18.00 वा.सु. पुर्वीचा वाद उफाळून आला. यात दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 506 अन्वये गुन्हे दि. 06 व 07.10.2020 रोजी नोंदवले आहेत.

No comments