उस्मानाबाद : महावितरण कार्यालयात गोंधळ- फोडतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखलउस्मानाबाद : महावितरण कर्मचारी- श्रीकांत पाटील हे दि. 08.10.2020 रोजी 12.00 वा. उस्मानाबाद शहरातील महावितरण कार्यालयात कर्तव्यावर होते. यावेळी 1)संजय गोकूळ पवार 2)हितेंद्र रमेश पवार, दोघे रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी कार्यालयात येउन वाढीव विजबील रद्द करण्याबाबत हुज्जत- गोंधळ घालून अपशब्द वापरून महावितरण कार्यालयातील 7 प्लास्टीक खुर्च्या व टेबल यांची तोडफोड करुन टेबलवरील शासकीय कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. अशा प्रकारे त्या दोघांनी लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण  करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यावरुन श्रीकांत पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 506 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम- 3  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 


No comments