Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल


 उस्मानाबाद  -  देवळाली, ता. उस्मानाबाद येथील देशमाने कुटूंबातील 1)सुजीत देशमाने 2) सिध्देश्वर देशमाने 3) उमा देशमाने यांच्या गटाचा गावातीलच देशमुख कुटूंबातील- 1) अनिरुध्द देशमुख 2)सुनिल देशमुख 3)दिलीप देशमुख यांच्या गटाशी दि. 05.10.2020 रोजी 09.00 वा.सु. शेतातील रस्ता दुरुस्ती व रहदारीच्या कारणावरुन वाद उफाळून आला. यात दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी गटास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 506, 34 अन्वये 2 गुन्हे दि. 07.10.2020 रोजी नोंदवले आहेत.


 

उमरगा: शिवाजी जगन्नाथ माने, रा. माडज, ता. उमरगा व त्याची बहिण- भामाबाई व मुहुणा- राम गायकवाड यांसह दि. 04.10.2020 रोजी 16.00 वा. सु. माडज शिवारातून ट्रॅक्टरमध्ये सोयाबीन घेउन जात होते. यावेळी गावातील नातेवाईक- मारुती गायकवाड, मोहण गायकवाड, शारदाबाई गायकवाड यांनी ट्रॅक्टर नेत असलेल्या वाटेच्या कारणावरुन शिवाजी माने यांसह त्यांची बहिण व मेहुणा यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी माने यांच्या हाताच्या बोटाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या शिवाजी माने यांनी दि. 07.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

आंबी: देविदास साधु हगारे, रा. ताकमोडवाडी, ता. परंडा यांनी दादा बबन काळे, रा. धनेगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर यांच्या स्कोडा कारला वाहनाने हुलकावणी दिली होती. याचा राग मनात धरुन दि. 06.10.2020 रोजी 17.30 वा. सु. दादा काळे, योगेश काळे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, विलास सुरवसे, सर्व रा. धनेगाव यांनी उंडेगाव शिवारात देविदास हगारे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या देविदास हगारे यांनी दि. 07.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments