Header Ads

उमरगा : शेतमालाचे नुकसान करणाऱ्या संशयीताविरुध्द गुन्हा दाखल
 उमरगा: शिवाजी जाधव, रा. तुरोरी, उमरगा यांनी मुळज शिवारातील आपल्‍या शेतात सोयाबीन पिक कापून त्याचा ढिग करुन झाकून ठेवले होते. त्या सोयाबीन ढिगातील अंदाजे 20 पोती सोयाबीन काडाचे दि. 06 ते 07.10.2020 या कालावधीत नुकसान झाल्याचे आढळले. हे नुकसान सख्खा भाऊ- ज्ञानेश्वर जाधव याने पुर्वीच्या वादाचा राग मनात धरुन केले असावे. अशा मजकुराच्या शिवाजी जाधव यांनी दि. 08.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अपघात

लोहारा: चालक- नितीन मुकूंदा सोनकांबळे, रा. जेवळी (द.), ता. लोहारा याने ट्रक क्र. ए.पी. 23 टीए 1478 हा दि. 04.10.2020 रोजी 13.00 वा. सु. जेवळी (द.) गावातील वेशीत निष्काळजीपणे, हयगईने चालवून रस्त्याच्या कडेला थांबलेले सतिश अशोक उपासे, रा. जेवळी (द.) यांना धडक दिली. या अपघातात सतिश उपासे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद ट्रक चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सतिश उपासे यांनी दि. 07.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments