उस्मानाबाद : ब्लॅकमेल करून तरुणीवर बलात्कार


उस्मानाबाद-  माझ्या मोबाईल मधील तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवतो. अशी धमकी देउन उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणीचे (नाव- गाव गोपनीय) तीच्याच गावातील एका तरुणाने दि. 01.10.2020 रोजी अपहरण केले,  दि. 04.10.2020 पर्यंत तीला कर्नाटक, तेलंगण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नेउन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. 


या प्रकाराची वाच्यता केल्यास तुझ्या मुलीला ठार मारेल अशी धमकी दिली. त्या तरुणीने त्या तरुणाची नजर चुकवून स्वत:ची सुटका करून घेतली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 366, 376 (2)(एन), 323, 506 अन्वये गुन्हा दि. 07.10.2020 रोजी नोंदवला आहे.


 

No comments