Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाण, चोरी, अफरातफर गुन्हे दाखल


मारहाण 

आंबी: कैलास हणुमंत महानवर, रा. कंडारी, ता. परंडा यांना दि. 14.10.2020 रोजी 16.30 वा. सु. आरोपीच्या शेतामध्ये भाऊबंद- विशाल  विठ्ठल महानवर, कृष्णा विठ्ठल महानवर, सोमनाथ माधव महानवर, संतोष पांडूरंग महानवर, पांडूरंग माधव महानवर, प्रदिप बिरू महानवर सर्व रा.कंडारी यांनी गैर कायदयाची मंडळी जमवून शेतातील ताल फोडून पावसाचे पाणी लावण्याचे कारणावरून व पुर्वीपासून असलेल्या भांडणाचा मनात राग धरून फिर्यादीस लोखंडी गजाने व दगडाने डोकीत, गालावर,डाव्या हातावर मारून जखमी करून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कैलास महानवर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143,147,148,149,504, 506, अन्वये गुन्हा नोंदवला आहे


                                                                              चोरी

शिराढोण: पाशा हनीफ सय्यद , रा. शिराढोण ता.कळंब यांच्या घरासमोर लावलेली हिरो होडां मोटार सायकल क्र. एम.एच.24 यु. 6365 जुनी वापरती कि.अं.20,000 रू ची  दि. 21.09.2020 रोजी 22.00 ते दि.22.09.2020 रोजीचे 0600 वा अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या पाशा सय्यद यांनी दि. 15.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अफरातफर

लोहारा: रविंद्र दगडू भोसले रा.मातोळा ता.उमरगा यांने स्वताच्या फायदयासाठी गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑ सोसायटी नांदेड शाखा सास्तुर येथे प्रभारी शाखा अधिकारी पदाचा दि.07.09.2020 रोजीचे 17.20 ते दि.10.09.2020 रोजीचे 2154 वा. पावेतो गैरवापर करून 9,12,828 रूपयाची अफरातफर केली. अशा मजकुराच्या उमाकांती प्रकाश जंगले वय 26 वर्ष रा.सिडको नांदेड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 408,506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments