Header Ads

उस्मानाबाद पोलीस दलातील १२ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द


सपोनि मुंडे आणि उपनिरीक्षक झिंझूर्डे यांचे निलंबन रद्द झाल्याने आश्चर्य 


उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या  १२ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. वसुली  प्रकरणी निलंबित करण्यात आलेले सपोनि जी.ए. मुंडे ( उस्मानाबाद )  आणि  अणदूर गांजा प्रकरणी निलंबित करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक जी. एस. झिंझूर्डे ( तुळजापूर )  यांची खातेनिहाय चौकशी सुरु असताना आणि चौकशी पूर्ण झाली नसताना, निलंबन रद्द करण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस दलात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. गेल्या सहा महिन्यात  विविध कारणामुळे जवळपास २० ते २५ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित  करण्यात आले होते. मात्र अनेकांवर चौकशीची टांगती तलवार असताना, त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. 


कोण आहेत हे पोलीस कर्मचारी ? 
No comments