उस्मानाबाद : पोलीस निरीक्षक ठोंबरे यांचे निलंबन अवघ्या एक महिन्यात रद्द

 


पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांची कोंडी 


 उस्मानाबाद  : पोलीस निरीक्षक ठोंबरे यांचे निलंबन अवघ्या एक महिन्यात रद्द


उस्मानाबाद -  तुळजापूरहून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात मुदतपूर्व  बदली केल्यानंतर प्रदीर्घ रजेवर गेलेल्या पोलीस निरीक्षक साईनाथ उर्फ एस.आर.ठोंबरे यांना  प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक ( औरंगाबाद परिक्षेत्र ) निसार तांबोली यांनी ११ सप्टेंबर  रोजी निलंबित केले होते, पण नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लीकार्जुन  प्रसन्ना यांनी ठोंबरे यांचे निलंबन अवघ्या एक महिन्यात रद्द केले आहे. 


तुळजापूरचे पोलीस निरीक्षक साईनाथ उर्फ एस.आर.ठोंबरे आणि उमरग्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे  यांची  पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन  यांनी १ नोहेंबर २०१९ रोजी  उस्मानाबाद  पोलीस मुख्यालयात मुदतपूर्व बदली केली  होती, त्यानंतर हे दोघे मुख्यालयात रुजू होऊन लगेच वैद्यकीय रजेवर गेले होते. दोन वर्षाच्या आत बदली केली म्हणून उभयतांनी मॅट मध्ये धाव घेतली असताना, ११ सप्टेंबर २०२० रोजी त्यांच्या निलंबनाचा आदेश निघाला होता.


पोलीस निरीक्षक एस.आर.ठोंबरे आणि सुरेश चाटे  यांनी मुदतपूर्व बदली केली म्हणून औरंगाबादच्या मॅटमध्ये धाव घेतली असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणी तारखेस गैरहजर राहिले म्हणून पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन आणि  तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी टिपरसें यांना  प्रत्येकी पाच हजार रुपये  दंड करण्यात आला आहे. त्यानंतर झालेल्या तारखेस पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी कोरोना झाल्याचे मेडिकल  सर्टिफिकेट दाखवल्याने त्याची सुनावणी पुढील नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. 


दरम्यान, पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांचे देखील निलंबन विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लीकार्जुन  प्रसन्ना यांनी रद्द केले आहे. 


उस्मानाबादच्या पोलीस विभागात पोलीस अधीक्षकांचा एक आवडता आणि एक ना आवडता गट आहे. आवडत्या पोलीस अधिकाऱ्याना  क्रीम पोस्टिंग मिळत असून, प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याना  नाहक त्रास दिला जात आहे. 





From around the web