Header Ads

कळंब : महिलेचा विनयभंग

 कळंब: एका परुषाने (नाव- गाव गोपनीय) दि. 16.10.2020 रोजी 11.30 वा. सु. पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन शेजारच्या गावच्या महिलेस शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन तिला लज्जा वाटेल या उद्देशाने हात धरुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत पुरुषाविरुध्द भा.दं.सं. कलम- 354, 504, 506 आणि ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत दि. 17.10.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलाचे अपहरण

वाशी: ऋषिकेश बाळासाहेब करगळ, वय 17 वर्षे, रा. चांदवाड, ता. भुम हा रामकुंड येथील त्याच्या आजीला भेटून परत चांदवड येथे जाण्यासाठी दि. 12.10.2020 रोजी 12.00 वा. सु. सरमकुंडी फाटा येथे आला होता. दरम्यान ऋषिकेश याचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या लक्ष्मण रामदास हाके, रा. रामकुंड, ता. भुम यांनी दि. 17.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

No comments