उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना
उस्मानाबाद : सांजा रोड, उस्मानाबाद येथील सर्वे क्र. 217/5 प्लॉट क्र. 156 येथील महावितरण कंपनीचे रोहित्र व त्यासाठी लागणारे खांब असा एकुण 80,000/-रु. चा माल दि. 06 व 07.10.2020 रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या महावितरण उस्मानाबाद शहर शाखेचे सहायक अभियंता- अशोक चाटे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 ढोकी: सुजित नारायण चणे, रा. कुरुदा, ता. वसमत हे दि. 10.10.2020 रोजी 00.30 वा. सु. स्वीफ्ट कार क्र. एम.एच. 26 एके 3319 ही दुधगाव शिवारातील तेरणा नदी पुलाजवळील रस्त्याने चालवत होते. यावेळी रस्ता खराब असल्याने ते कार सावकाश चालवत असतांना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील रेडमी 8 मोबाईल फोन घेउन पळुन गेला. अशा मजकुराच्या सुजित चणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 उमरगा: वैभव माणिकराव मालखरे, रा. गणेश नगर, उमरगा यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चारेट्याने दि. 09.10.2020 रोजी 13.00 ते 15.00 वा. चे दरम्यान कापून आतील 17 ग्रॅम सोन्याचे गंठण चोरुन नेले. अशा मजकुराच्या वैभव मालखरे यांनी दि. 10.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


शिराढोन: उत्रेश्वर उत्तम जाधव, रा. गोविंदपुर, ता. कळंब व त्यांचे शेजारी- भाग्यवंत बाबुराव घुगे अशा दोघांच्या घराचे कुलूप अज्ञात चारट्याने दि. 09 व 10.10.2020 रोजीच्या मध्यरात्री तोडून दोघांच्या घरातील एकुण 65 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, विवो मोबाईल फोन- 1 व रोख रक्कम 1,10,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या उत्रेश्वर जाधव यांनी दि. 10.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


बेंबळी: धनाजी पांडुरंग वाघमारे, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांच्या करजखेडा येथील ‘बालाजी फुटवेअर’ दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 10.10.2020 रोजी मध्यरात्री उचकटून आतील व्हिकेसी, पैरागॉन, वरजीन व इन्डास कंपनीचे चप्पल एकुण 75 नग  चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या धनाजी वाघमारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments