Header Ads

उस्मानबाबाद : कारागृह कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्या कैद्यावर गुन्हा दाखल


उस्मानाबाद - किरकोळ कारणावरून उस्मानाबाद कारागृहातील कारागृह कॉन्स्टेबल नारायण माटेकर यांच्याशी एका कैद्याने हुज्जत घालून मी जामिनावर बाहेर आल्यावर तुला जिवे मारतो” अशी धमकी दिली. यावरून सदर  कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


कारागृह कॉन्स्टेबल- नारायण बाबुराव माटेकर हे दि. 16.10.2020 रोजी 20.00 वा. उस्मानाबाद जिल्हा कारागृहात पहाऱ्यावर होते. यावेळी कारागृहातील बॅरेक क्र. 1 च्या दरवाजावर कैद्यांनी अडकवलेल्या कपड्यांमुळे बॅरेक मधील परिसर दिसुन येत नसल्याने विपरीत घटना घडू नये व कैद्यांची सुरक्षाव्यवस्था चोख व्हावी या करीता दरवाजाजवळ बसलेला कैदी- सलिम इलाही नदाफ, रा. सिंदगाव, ता. तुळजापूर यास अडकवलेले कपडे काढण्यास नारायण माटेकर यांनी सांगीतले. यावर चिडून जाउन सलिम नदाफ याने माटेकर यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन, “मी जामिनावर बाहेर आल्यावर तुला जिवे मारतो” असे धमकावून माटेकर यांची गचांडी धरुन ढकलून दिले. अशा प्रकारे सलिम नदाफ याने लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन कारागृह कर्मचारी- नारायण माटेकर यांनी दि. 17.10.2020 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments