Header Ads

उस्मानाबाद : अतिक्रमण करणाऱ्यावर गुन्हा दाखलउस्मानाबाद -  मल्हारी रावसाहेब ओमसे, रा. यशवंतनगर, उस्मानाबाद यांच्या वडगांव (सि.) सर्वे क्र. 415 मधील शेतावर कब्जा करण्याच्या उद्देशाने 1) नाना अंबादास जानराव 2) साधु भागवत जानराव 3) भागवत अंबादास जानराव 4) मिनषा अंबादास जानराव, सर्व रा. वडगांव (सि.), ता. उस्मानाबाद यांनी दि. 15.10.2020 रोजी 14.45 वा. सु. नमूद शेतातील खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून खोलीवर ‘श्री जानराव बंधु फॉर्म हाउस’ असे नाव टाकल्याचे मल्हारी ओमसे यांना दिसले. अशा मजकुराच्या मल्हारी ओमसे यांनी दि. 16.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 461, 506, 34 अन्वये गुन्हा नोदवला आहे.


 मारहाण


मुरुम: डिगंबर सिद्राम डिग्गीकर, रा. आष्टाकासार, ता. लोहारा हे दि. 15.10.2020 रोजी 23.00 वा. सु. स्वत:च्या राहत्या घरी होते. यावेळी गावकरी- गंगाराम हनमंत डिग्गीकर व शिवाजी हनमंत डिग्गीकर या दोघा भावांनी डिगंबर यांच्या घरात घुसून, “तुम्ही आमच्या जागेत मुरुम का टाकला” असा जाबविचारून डिगंबर यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करुन दगड फेकून मारला व घराची काच फोडून नुकसान केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या डिगंबर डिग्गीकर यांनी दि. 16.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 336, 337, 509, 294, 427, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

बेंबळी: सचिन भानुदास मस्के, रा. तोरंबा, ता. उस्मानाबाद यांना दि. 16.10.2020 रोजी 02.00 वा. सु. घराबाहेर संशयास्पद आवाज आल्याने त्यांनी बाहेर येउन पाहिले असता भाऊबंद- राजेंद्र शामसुंदर मस्के हा हातात लोखंडी उलतने घेउन त्यांच्या ॲक्टीव्हा स्कुटरवर मारुन स्कुटरचे नुकसान करत असलेला आढळला. सचिन मस्के यांनी त्यास जाब विचारला असता राजेंद्र मस्के याने त्या उलतन्याने सचिन यांच्या हातावर मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सचिन मस्के यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 427 अन्वये गुन्हा  नोंदवला आहे.

No comments