उस्मानाबाद जिल्ह्याचे चोरीच्या दोन घटना

 
भुम: जालींदर उजन काळे, रा. कुसुमनगर, भुम हे दि. 09.10.2020 रोजी 21.00 वा. सु. स्वत:च्या घराच्या हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास शेजारील खोलीचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आतील 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15,000/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या जालींदर काळे यांनी दि. 11.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.बेंबळी: बाबा मुसा शेख, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांच्या बेंबळी येथील किराणा दुकानाच्या शेडचा मागील बाजूचा पत्रा अज्ञात चोरट्याने दि. 10 व 11.10.2020 रोजी दरम्यानच्या रात्री कापून दुकानातील किराणा साहित्य (तांदळाचे 15 कट्टे, साखरेचे 9 कट्टे, तेल डबा- 5 नग, साबन, बिस्कीट, काजु, बदाम) व रोख रक्कम 4,000/-रु. असा एकुण 69,490/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या बाबा शेख यांनी दि. 11.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments