Header Ads

मुरुम: आईस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल मुरुम: काशिबाई बाळाप्पा लामजणे, वय 58 वर्षे, रा. सुपतगाव, ता. उमरगा यांनी दि. 10.10.2020 रोजीच्या मध्यरात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. आई- काशिबाई लामजणे यांनी त्यांच्या भावाकडून उसने पैसे आणावेत या कारणावरुन त्यांचा मुलगा- विश्वजीत व सुन- स्वरांजली हे दोघे काशिबाई यांना वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ करत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळुन काशिबाई यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या काशिबाई यांचे पती- बाळाप्पा बसप्पा लामजने यांनी दि. 11.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments