Header Ads

बेंबळी : सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल बेंबळी: सुन- आश्विनी रामेश्वर इंगळे, वय 22 वर्षे, रा. महादेववाडी, ता. उस्मानाबाद यांचा  1) रामेश्वर सुरेश इंगळे (पती) 2) इंदुबाई (सासु) 3) सुरेश (सासरा), तीघे रा. महादेववाडी, ता. उस्मानाबाद हे किरकोळ कारणावरुन मागील सात- आठ महिन्यांपासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून आश्विनीने दि. 10.10.2020 रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या आश्विनी यांचे वडील- केशव शिंदे, रा. अंबुलगा (बु.), ता. निलंगा यांनी दि. 11.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.मारहाण


 बेंबळी: मोहन यशवंतराव सुर्यवंशी, रा. टाकळी (बेंबळी), ता. उस्मानाबाद यांना दि. 11.10.2020 रोजी 10.30 वा. सु. गावातील जि.प. शाळेसमोर भाऊबंद- प्रदिप रावसाहेब सुर्यवंशी व श्रीकांत प्रदीप सुर्यवंशी या दोघा पिता- पुत्रांनी शेतातील सामाईक बांधावरील रहदारीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन चावा घेउन, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मोहन सुर्यवंशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

No comments